Satara | महाश्रमदानातून किल्ले प्रतापगडाच्या तटबंदीचा रस्ता खुला

सातारा, (प्रतिनिधी) – युनेस्कोद्वारा जागतिक वारसा स्थळ २०२४ यादित नामांकन पूर्व तयारीच्या अनुशंघाने किल्ले प्रतापगड या ठिकाणी स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत महास्वच्छता अभियानाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ग्रामस्थ, कर्मचारी, शालेय विद्यार्थ, य़ुवक मंडळे, हिलदरी संस्था, गाईड संघटना, हाॅटेल संघटना संयुक्त वन व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कुंभरोशी यांच्यावतीने किल्ल्याचा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी केलेल्या श्रमदानातून पाच किलाेमीटर तटबंदी लगतचा मार्ग स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत एक दिवस स्वच्छतेसाठी या उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ किल्ले प्रतापगड येथे याशनी नागराजन यांच्या हस्ते गुरुवारी झाला. यावेळी पाणी व स्वचता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, गटविकास अधिकारी अरुण मरबळ,
सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव कांबळे, कुंभरोशी सरपंच कांचन सावंत,गटशिक्षणाधिकारी आनंद पळस, बांधकामचे उपअभियंता संजय जाधव, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता संजय भोसले, पशुधन अधिकारी कविता खोसे, तालुका तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.प्रज्ञुम्न बुलाख आदी उपस्थित होते.
गाईड सामजिक संघ, वन व्यवस्थापन समिती किल्ले प्रतापगड सर्व ग्रामस्थ, जय भवानी जय भवानी महिला बचत गट किल्ले प्रतापगड, पारसोंड व शिरवली केंद्रातील सर्व शाळा, महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाळा, छत्रपती हायस्कूल एज्युकेशन शिरवली आदींच्या श्रमदानाच्या माध्यमातून तटबंदीचा रस्ता स्वच्छ करून खुला करण्यात आला.
श्रमदानातून झालेल्या या कामामुळे पर्यटकांना ज्याठिकाणी बुरुज पाहणी करता जाता येत नव्हते त्याठिकाणी जाता येणार आहे. यावेळी शिक्षण विभागाच्या वतीने वकतृत्व, चित्रकला, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. हिलदरी संस्थेच्या वतीने ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे प्रात्यक्षित बचतगटांच्या महिलांना व ग्रामस्थांना करुन दाखवण्यात आले.
यावेळी कुंभरोशीचे उपसरपंच ज्योती जंगम, विलास मोरे, वन समिती अध्यक्ष चंद्रकांत उत्तेकर आनंद उतेकर.अमोल जंगम. सतीश जंगम, महादेव कासुर्डे, विलास जाधव, कादर सय्यद, धनजय जंगम, दुर्ग संघटणेचे पदाधिकारी,
हिलदारी संस्थेचे कर्मचारी राम भोसले, अश्विनी राऊत, प्रतिमा बोडरे, अलि पटेल, गौरी चव्हाण, अनुराग खरे, अभिषेक खरे, स्वाती सपकाळ, स्वच्छता विभागाचे जिल्हा तज्ञ धनाजी पाटील, अजय राऊत विस्तार अधिकारी सुनिल पार्टे,
आप्पा जाधव, सुनिल चिकणे, विशाल घाडगे, ग्रामसेवक माणिक माळवे, किल्ले प्रतापगड ग्रामस्थ, शिक्षक. आरोग्य सेवक, आशा सेविका, आंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते.यावेळी मॅप्रो कंपनीने स्वच्छतेचे साहित्य ग्लोज पुरवले होते.
त्याचपमाणे विद्यार्थ्यांना दिला. हाॅटेल सह्यादीच्यावतीने विद्यार्थ्यांच्या दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.
हिरदरी व संयुक्त वन समिती यांनी स्वच्छतेचे साहित्य खराटे , फावे पुरवले होते. दरम्यान यावेळी याशनी नागराजन यांनी किल्ल्यावरील बुरुज, तटबंदी व शिवकालीन पाण्याच्या तळ्याची पाहणी केली.
किल्ले प्रतापगडावरील स्वच्छतेमुळे पर्यटकांना सर्व किल्ला पाहता येणार आहे. किल्ले प्रतापगडाची जागतिक वारसा स्थळामध्ये मानांकन मिळणे ही सातारा जिल्हयाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. किल्ल्यांच्या स्वच्छतेत सातत्य ठेवणे आवश्यक आहे.
जागतिक वारसास्थळामध्ये या किल्ल्याचा सामावेश होण्याच्या दृष्टीने गावातील व परिसरातील नागरिकांनी युनेस्कोच्या समितीशी माहितीपूर्ण संवाद साधावा.
हा किल्ला आपल्या इतिहासाचा वैभवशाली वारसा असून सर्वांनीच त्याच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. – याशनी नागराजन (मुख्य कार्यकारी अधिकारी)





