New Rules 1st April | येत्या 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरू होणार आहे. काही नियम आता आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहेत. 1 एप्रिलपासून लोकांच्या पैशांशी संबंधित काही महत्त्वाचे बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. एटीएममधील नियमात बदल एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा कमी केली आहे. आता तुम्ही महिन्यातून फक्त तीनदा एटीएममधून कोणत्याही चार्जशिवाय पैसे काढू शकतात. यानंतर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर २० ते २५ रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. UPI च्या नियमांमध्येही बदल UPI च्या नियमांमध्येही बदल करण्यात येणार आहे. यामध्ये जे मोबाईल नंबर UPI खात्याशी जोडले आहेत परंतु खूप कालावधीसाठी त्याचा वापर केलेला नाही त्यांना बँक रेकॉर्डमधून काढण्यात येणार आहे. खूप कालावधीसाठी यूपीआय वापरले नसल्यास ही सेवा बंद केली जाणार आहे. एलपीजीच्या किमतीत बदल एलपीजीवर परिणाम तेल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमती सुधारतात. दीर्घकाळापासून एलपीजीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र नवीन आर्थिक वर्षात एलपीजीच्या किमतीत काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. टॅक्सच्या नियमांमध्ये बदल नवीन आर्थिक वर्षात टॅक्सच्या नियमांमध्येही बदल होणार आहे. यामध्ये नवीन कर प्रणाली लागू केली जाणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या उत्पन्नासाठी वेगवेगळा टॅक्स भरावा लागणार आहे. यामध्ये कलम 80C अंतर्गत कोणताही बदल करण्यात आला नाही. बचत खात्याबाबत नियम बचत खात्यात कमीत कमी बॅलेंस ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही बॅलेंस ठेवला नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. वेगवेगळ्या बँकेचे, ब्रँचचे बचत खात्याबाबत वेगवेगळे नियम आहेत. बचत खात्याचे व्याज आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असणार आहे. जिवंत सातबारा मोहीम सातबाऱ्यावरील सर्व मृत खातेदारांऐवजी वारसांची नावे नोंदवली जाणार आहेत. राज्यभरात 1 एप्रिल पासून सुरू ही मोहीम राबवण्यासाठी तहसीलदारांची समन्वय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिवंत सातबारा मोहीम ‘ राबवण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. हेही वाचा: Amit Shah : “लोकसभेत बोलण्याची वेळ आली की राहुल गांधी परदेशात असतात”; अमित शहांचा जोरदार हल्लाबोल