FridgeTips: आजच्या काळात फ्रिज हे प्रत्येक घरातील अत्यावश्यक उपकरण बनलं आहे. विशेषतः उन्हाळ्यात दूध, भाज्या, फळं आणि शिजवलेलं अन्न ताजं ठेवण्यासाठी फ्रिजची मोठी गरज असते. मात्र काही वर्षांनंतर अनेकजण तक्रार करतात की फ्रिज (Fridge)पूर्वीसारखं थंड राहत नाही किंवा वीज बिल खूप वाढतं. अनेकांना वाटतं की मशीनमध्ये बिघाड झाला आहे, पण प्रत्यक्षात यामागचं मोठं कारण म्हणजे रोजच्या वापरातील काही चुकीच्या सवयी. सर्वात मोठी चूक म्हणजे गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणं. अनेकजण घाईत गरम भाजी, डाळ किंवा दूध थेट फ्रिजमध्ये ठेवतात. त्यामुळे फ्रिजच्या आतलं तापमान अचानक वाढतं आणि कंप्रेसरवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी फ्रिजला अधिक मेहनत करावी लागते, वीज जास्त खर्च होते आणि कूलिंग सिस्टिम हळूहळू कमकुवत होऊ लागते. त्यामुळे कोणतंही गरम अन्न आधी सामान्य तापमानाला येऊ द्या आणि नंतरच फ्रिजमध्ये ठेवा. (FridgeTips) फ्रिज भिंतीला अगदी चिकटवून ठेवणंही धोकादायक ठरू शकतं. अनेक घरांमध्ये जागेअभावी फ्रिज भिंतीलगत ठेवला जातो. पण त्यामुळे मागील बाजूच्या कंडेन्सरला हवा मिळत नाही आणि मशीनची उष्णता बाहेर पडत नाही. यामुळे फ्रिज सतत गरम राहतो आणि त्याची कूलिंग क्षमता कमी होऊ लागते. फ्रिज आणि भिंत यांच्यात किमान सहा इंच अंतर ठेवणं गरजेचं आहे. (FridgeTips) FridgeTips: सावधान! फ्रिज वापरताना ‘या’ सवयींमुळे वाढू शकतं वीज बिल फ्रिजचं दार वारंवार उघडणं किंवा बराच वेळ उघडंच ठेवणंही नुकसानकारक ठरतं. असं केल्याने थंड हवा बाहेर जाते आणि पुन्हा तापमान कमी करण्यासाठी फ्रिजला जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे कूलिंगवर परिणाम होतो आणि वीज बिलही वाढू शकतं. म्हणून गरज असेल तेव्हाच फ्रिज उघडा आणि वापर झाल्यावर लगेच बंद करा. अनेकजण फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान भरतात. त्यामुळे थंड हवा व्यवस्थित फिरू शकत नाही. काही भाग खूप थंड राहतात तर काही भागात पुरेशी थंडी पोहोचत नाही. सतत ओव्हरलोड राहिल्यामुळे कंप्रेसरवरही ताण वाढतो. त्यामुळे फ्रिजमध्ये सामान ठेवताना हवा फिरण्यासाठी पुरेशी जागा ठेवणं आवश्यक आहे. (FridgeTips) फ्रिजची नियमित साफसफाई न करणंही मोठी चूक आहे. मागील कॉइल्स आणि आतल्या ट्रेवर धूळ जमा झाली की मशीनची कार्यक्षमता कमी होते. मोटरला अधिक मेहनत करावी लागते आणि दुर्गंधी किंवा बॅक्टेरियाही वाढू शकतात. त्यामुळे महिन्यातून किमान एकदा फ्रिज आतून आणि बाहेरून स्वच्छ करणं गरजेचं आहे. तसेच चुकीची तापमान सेटिंगही नुकसान करू शकते. खूप कमी तापमान ठेवल्यास वीज जास्त खर्च होते, तर कमी कूलिंगमुळे अन्न खराब होऊ शकतं. हवामान आणि गरजेनुसार योग्य तापमान ठेवणं महत्त्वाचं आहे. याशिवाय, ज्या भागात व्होल्टेजचा चढ-उतार जास्त असतो तिथे स्टॅबिलायझर वापरणं आवश्यक आहे. अन्यथा कंप्रेसर आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्स खराब होण्याची शक्यता वाढते. योग्य काळजी घेतली, तर फ्रिजची कूलिंग चांगली राहते, वीज बिल कमी येतं आणि उपकरण अनेक वर्षे व्यवस्थित चालतं.