सातारा – सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 12) दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पाठीमागील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग ठेवत ही सभा होणार आहे.
जिल्हा परिषदेची सभा छत्रपती शिवाजी सभागृहात होत असते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. शुक्रवारी होणारी सभा यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. हे सभागृह सॅनिटायझर करण्यात येणार असून प्रवेशद्वारावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सभेस येताना चेहऱ्यावर मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. अर्थसंकल्पीय सभेनंतर ही सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.