एकेकाळी 12वी नापास, आता 7 दिवसात केली 336 कोटींची कमाई; जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती?

Girish Mathrubootham Success Story: अपयश विसरून सातत्याने मेहनत घेत राहिल्यास एकदिवस नक्कीच यश मिळते. रातोरात यशस्वी होण्यासाठी त्याआधी वर्षानुवर्ष मेहनत घ्यावी लागते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गिरीश माथरूबूथम. एकेकाळी 12वी नापास असलेल्या गिरीश माथरूबूथम यांनी स्वतःची कंपनी स्थापन करत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. आज ते एक यशस्वी उद्योजक असून, त्यांची कंपनी अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे.
12वी नापास ते इंजिनिअर
गिरीश माथरूभूथम 12वी ला नापास झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक व मित्रांनी त्यांची खिल्ली उडवण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन रिक्षाचालक बनशील, असेही त्याला म्हणाले. मात्र, गिरीश यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. शिक्षणानंतर त्यांना HCL मध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर ते जोहो या सॉफ्टवेअर कंपनीत लीड इंजिनिअर पदावर रुजू झाले.
उभारली 53000 कोटींची कंपनी
नोकरीनंतर गिरीश यांनी स्वतःची ‘फ्रेशवर्क्स’ नावाची कंपनी सुरू केली आहे. कंपनी आयटी सोल्यूशन्स उपलब्ध करते. आज या कंपनीचे मुल्य 53000 कोटी रुपये आहे. त्यांनी 2010 मध्ये जोहोमधील नोकरी सोडून फ्रेशवर्क्सची सुरुवात केली होती. वर्ष 2018 पासून आतापर्यंत कंपनीचे 125 देशांमध्ये 1 लाखांपेक्षा अधिक ग्राहक आहेत. सध्या त्यांच्याकडे कंपनीची 5.229 टक्के हिस्सेदारी आहे. याची एकूण संपत्ती 2,369 कोटी रुपये आहे.
7 दिवसात 340 कोटी रुपयांची कमाई
काही दिवसांपूर्वीच गिरीश यांनी फ्रेशवर्क्सच्या काही शेअर्सची विक्री केली. त्यांनी 7 दिवसांमध्ये जवळपास 336.41 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. अशाप्रकारे, मागील 1 आठवड्यात त्यांनी जवळपास 336 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यासोबतच, त्यांनी फ्रेशवर्क्ससोबतच आता SaaS (सॉफ्टवेयर ऐज अ सर्व्हिस) व्यवसायात देखील प्रवेश केला आहे.





