देवभूमीतील फ्रेश लव्हस्टोरी ! अमेय वाघ आणि वैदेहीची भन्नाट केमेस्ट्री JAGGU ANI JULIET’ चा हटके Teaser प्रदर्शित

Updated On:
देवभूमीतील फ्रेश लव्हस्टोरी ! अमेय वाघ आणि वैदेहीची भन्नाट केमेस्ट्री JAGGU ANI JULIET’ चा हटके Teaser प्रदर्शित

मुंबई – प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांच्या बहुचर्चित ‘जग्गू आणि ज्युलिएट’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाच्या टीजरची प्रतीक्षा चाहत्यांना होती. टीजरमध्ये अमेय वाघ एका आगरी कोळी तरुणाच्या भूमिकेत तर वैदेही विदेशातून आलेल्या तरुणीच्या भूमिकेत दिसत आहे. टीजरमध्ये दोघांची मजेदार केमेस्ट्री पाहायला मिळत आहे.

‘जग्गू आणि जुलिएट’ नावावरूनच हा चित्रपट काहीतरी हटके घेऊन येणार हे निश्चित झालं होत.त्यात ‘तवाफ्राय प्रेमाची रवाफ्राय लव्हस्टोरी’ या टॅगलाईनमुळे उत्कंठा आणखी वाढली होती. देवभूमी अर्थात उत्तराखंड येथून ही लव्हस्टोरी सुरु होत असल्याचे टीजरवरून समजते. अमेय वाघचे आगरी स्टाईल भन्नाट डायलॉग आणि त्याला अजय अतुलच्या तुफान म्यूजिकची साथ यामुळे हा टीजर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.

पुनीत बालन स्टुडिओजने चित्रपटाची निर्मिती केली असून अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी व्यतिरिक्त उपेंद्र लिमये आणि जयवंत वाडकर असे दिग्गज चेहरे देखील असणार आहेत.अमेय-वैदेही ही जोडी झोंबिवली या चित्रपटनानंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. २००८ मध्ये ‘यलो’ या चित्रपटाद्वारे सामाजिक भान असलेला विषय हाताळणारे महेश लिमये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यासोबतच चित्रपटात अजय अतुलचं जबरदस्त म्युजिक ऐकायला मिळणार आहे. येत्या १० फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Vaidehi Parshurami: मरून साडी, नाकात नथ… वैदेही परशुरामीचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल

2026-03-13 13:28:16

Vaidehi Parshurami: मरून साडी, नाकात नथ… वैदेही परशुरामीचा पारंपरिक लूक सोशल मीडियावर व्हायरल

'गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही'; 'या' अभिनेत्याचे वक्तव्य चर्चेत

2024-10-05 21:00:47

'गौतमी पाटीलपेक्षा दुसरा चांगला पर्याय महाराष्ट्रात नाही'; 'या' अभिनेत्याचे वक्तव्य चर्चेत

गौतमी पाटील आणि अमेय वाघ यांचे नवं कोरं ‘लिंबू फिरवंल’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

2024-09-08 16:32:13

गौतमी पाटील आणि अमेय वाघ यांचे नवं कोरं ‘लिंबू फिरवंल’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Shreyas Talpade Emotional| अमेय वाघची कविता ऐकून श्रेयस तळपदे भावूक

2024-03-13 10:30:36

Shreyas Talpade Emotional| अमेय वाघची कविता ऐकून श्रेयस तळपदे भावूक

Valentine Day Special : अमेय-वैदेहीची जोडी सुपरहिट ! जग्गू आणि जुलिएटमधील 'तू बी अन् मी बी' रोमँटिक गाणं एकदा पहाचं

2023-02-14 11:09:20

Valentine Day Special : अमेय-वैदेहीची जोडी सुपरहिट ! जग्गू आणि जुलिएटमधील  'तू बी अन् मी बी' रोमँटिक गाणं एकदा पहाचं