Kiara Advani Statement: “…स्वातंत्र्यच हिरावलं”; कियारा आडवाणी जुन्या व्हिडिओमुळे ट्रोल

Kiara Advani Statement: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात तिने स्वातंत्र्य आणि लोकशाहीसारख्या गंभीर विषयांवर भाष्य केले होते. मात्र यातील तिच्या एका विधानाने वाद निर्माण झाला आहे.
एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांसोबत बोलताना कियारा म्हणाली की, “सरकारने गोमांस आणि नंतर पॉर्नवरही बंदी घातली, त्यामुळे लोकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले आहे. लोकशाहीवरही हल्ला झाला आहे. पुढे आणखी काय बंद होईल हे कोणालाही माहिती नाही. मला वाटते की हे लोकशाहीचा खरा अर्थ हिरावून घेत आहे.” Kiara Advani Statement:
त्यावेळी ती सेन्सॉरशिप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संदर्भ देत होती, पण आता हा व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत असून कियाराला ट्रोल केले जात आहे.
सोशल मिडियावर कियाराचे व्हिडिओ व्हायरल होताच तिला राष्ट्रविरोधी, असंवेदनशील अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. मात्र साधारण 10 वर्ष जुना असलेल्या या व्हिडिओची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी “शेरशाह” चित्रपटात एकत्र काम केले होते. कियारा अडवाणी शेवटची हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर सोबत “वॉर २” मध्ये दिसली होती. आता कियारा कन्नड स्टार यशच्या “टॉक्सिक” चित्रपटात दिसणार आहे. Kiara Advani Statement:
हेही वाचा:





