“माणुसकीची ऊब’कडून मोफत पाणीपुरवठा

वाठारस्टेशन येथे निष्णाईदेवीच्या यात्रेनिमित्त दलितवस्तीमध्ये अनोखा उपक्रम

वाठार स्टेशन – “माणुसकीची ऊब’ या मुंबई येथील सामाजिक संस्थेमार्फत वाठार स्टेशन येथे निष्णाईदेवीच्या यात्रेनिमित्त दलितवस्तीमध्ये मोफत पाणीपुरवठा करण्यात आला. “माणुसकीची ऊब’ या सामाजिक संस्थेने नाविन्यपूर्ण उपक्रम आजपर्यंत समाजामध्ये विशेषता आदिवासी पाड्यात केलेले आहेत. त्यामध्ये कुपोषित बालकांना आहार देणे, गोरगरिबांना कपडे, भांडी वाटप, रोजगार उपलब्ध करून देणे, बेवारस प्लॅटफॉर्मला राहणारे अनाथ व गरजू लोकांना हिवाळ्यात चादर वाटप केले. तसेच आदिवासी पाड्यातील गोरगरीब मुला-मुलींना पावसाळ्यात रेनकोट व पुस्तके अशा शालेय उपयोगी वस्तू या संस्थेतर्फे देण्यात येतात.

सामाजिक “माणुसकीची ऊब’ या संस्थेचे धडाडीचे युवा तडफदार कार्यकर्ते जय होल मुखे (रा. मुंबई) या अवलियाने कमी वयात सामाजिक बांधिलकी स्वीकारून हे आपले कर्तव्य आहे, अशा हेतूने ही संस्था स्थापन करून सर्व गोरगरिबांना कोणत्याही अडचणीत माणुसकीच्या हाकेला उभे राहतात. या संस्थेचे सल्लागार म्हणून संदेश संभाजी शिंदे हे या सामाजिक संस्थेचे कार्य करतात. तसेच या सामाजिक संस्थेत एकजुटीने काम करणारे कार्यकर्ते म्हणून प्रीती हसणाले, मेघना शिंदे, सुधीर सोनवणे, वैभव जोगळे, केतन कळंबे, राजू बोराटे, आनंद धडके, किरण शिंदे, कांचन धडके, गणेश खरात, अजिंक्‍य शिंदे या सर्व टीमने या सामाजिक संस्थेत हिरारीने कामगिरी केली. ज्या गरजू लोकांना कसलीही अडचण आल्यास माणुसकीची उब या संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन जय होल मुखे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)