पिंपरी | मावळात आता कॅन्सरवर मोफत उपचार

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये MJPJAY (महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य) योजनेतंर्गत मोफत कॅन्सर उपचार सुविधेचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख, गणेश खांडगे (प्रसिडेंट-टिजीएच), शैलेश शाह (अध्यक्ष-टिजीएच), डाँ.सत्यजीत वढावकर( सचिव- टिजीएच), डाँ. सचिन देशमुख, कार्यकारी संचालक, प्रताप राजेमहाडीक, संचालक आणि डाँ.संतोष साहू यांच्यासह सर्व डाँक्टर्स उपस्थित होते
कर्करोगाच्या रुग्णांवर रेडिओथेरपीसाठी अत्याधुनिक टोमोथेरपी या अद्ययावत उपचारप्रणालीचा या योजनेत समावेश झाला असून या आर्टीफिशियल इंटेलिजेन्सचा समावेश असलेल्या या तंत्राने कर्करोग झालेल्या अवयवावर ३६० च्या कोनामध्ये वि-किरण सोडून उपचार केले जातात. यामुळे रुग्णांवर अधिक परिणामकारकरित्या उपचार करणे शक्य होत आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना शहराकडे धाव न घेता आपल्या परिसरातच उत्तमोत्तम सेवा पुरविण्याचा प्रयत्न सेंटरच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचे टीजीएच – ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक उदय देशमुख यांनी व्यक्त केली.
आमदार सुनिल शेळके म्हणाले की, “टीजीएच आँन्को लाइफ कँन्सर रूग्णालयाच्या माध्यमातून व्यवसाय न पाहता सामाजिक बांधिलकी जपत रूग्ण सेवा हाच एकमेव उद्देश समोर ठेवून सेवा दिली जाते.
आता कँन्सर उपचारासाठी पुणे अथवा मुंबईसारख्या शहरांत न जाता तालुक्यातच उपचार मिळतील. त्यामुळे ही अतिशय समाधानकारक बाब आहे.




