मोफत शिलाई मशीन योजना खोटी –
\nमात्र ही संपूर्ण योजना बनावट आहे. सध्या शासनाकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाहीए. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या सरकारच्या अंतर्गत काम करणाऱ्या संस्थेच्या फॅक्ट चेक युनिटने हे बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकार अशी कोणतीही योजना चालवत नसल्याचे पीआयबीने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हा फसवणूक करण्याचा प्रयत्न आहे, कृपया काळजी घ्या, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.