पुणे जिल्हा | लाखो वारकर्यांना मोफत वैद्यकीय सेवा

इंदापूर, (प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासमवेत क्षेत्र देहू गावापासून ते पंढरपूरपर्यंत श्री गोपाल कृष्ण गोसेवा व अनुसंधान केंद्र कान शिवनी जिल्हा अकोला, या सामाजिक सेवा पथकाने गेल्या 34 वर्षापासून अखंड वारकर्यांना फिरते मोफत वैद्यकीय सेवा देत अनोखा विक्रम केला आहे.
यवत, वरवंड, उंडवडी गवळ्याची, बारामती, सणसर, अंथुर्ण, निमगावकेतकी, इंदापूर, सराटी, अकलूज, बोरगाव, इथपर्यंत सात लाख वारकर्यांना मोफत आरोग्यसेवा, मिष्टांन वितरण, रुग्णचिकित्सा, नेत्रचिकित्सा, चष्मा वितरण, चरण सेवा, मलमपट्टी विशेष होमिओपॅथी उपचार, करण्यात आल्याची माहिती श्री गोपाल कृष्ण गोसेवा केंद्राचे प्रकाश वाघमारे पाटील यांनी दिली.
यासंदर्भात माहिती देताना प्रकाश वाघमारे म्हणाले की, आमचे सेवा पथक क्षेत्र पंढरीला पायी जाणार्या वारकर्यांची सेवा करण्यासाठी, अहोरात्र मेहनत घेत असते सेवा पथकासोबत तीन-चार जड वाहने, 17 डॉक्टर 38 स्वयंसेवक खूप मेहनत घेत असतात. आमच्या संस्थेने सेवेचा संकल्प यामध्ये मिष्टान्न वितरण पहाटेच्या प्रहरापासून, वारकर्यांना सकाळी आठ पर्यंत होते.
यामध्ये पौष्टिक शिरा, सोन पापडी, आधी पदार्थ वारकर्यांना मोफत दिले जातात. वारकरी हा दिवसभर चालून थकलेला असतो. त्यातच पहाटे उठून पुन्हा पायी वारी सुरू होते. त्यांची दिवसभर ऊर्जा अखंड राहण्यासाठी पौष्टिक शिरा वरदान ठरला आहे.
यामध्ये डॉ. शिवचरण सिंह ठाकुर, राजकुमार बुले, रमेश बर्डे, दिनेश काकड, विजय घंगाळे, गीता घंगाळे, विद्याधर वनवे, जुनेश्वर बिडवे, जनार्दन वानखेडे, मुकुंद साठे, अमोल दिवाने, सुजित राऊत, मुरलीधर जळमकार, निलेश राऊत, राधा पारस्कर, प्रणाम पाटील, मंगेश कोल्हटकर, सचिन पारस्कर हे सर्व डॉक्टर वारीतील लोकांना अखंड सेवा देत आहेत.
तर चरण सेवा विभागात गोपाल घाटे, आकाश शिंदे, मंगेश चंदिवाले, मारुती वाघमारे, दादा साबळे, प्रशांत भट, गोपाल कावरे, अमोल वाघमारे, कृष्णा छबिले, दत्ता वाघमारे, ओंकार राव, आगरकर शिवा, गावडे, राहुल पवार, लक्ष्मी पवार, विशाल शिंदे, दत्तू लोंढे, दादा ढवळे काम पाहत आहेत.





