सिंहगड रोड परिसरात मोफत आरोग्य शिबिर; ८० जणांनी घेतला लाभ

पुणे – विश्व हिंदू परिषद सिंहगड भाग, अखिल सिंहगड रोड धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ११ मे २०२५) सिंहगड रोड परिसरात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत झालेल्या या शिबिराचा ८० नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराला विश्व हिंदू परिषद सिंहगड भागाचे अध्यक्ष शरदजी जगताप, विभागमंत्री केतनजी घोडके, बजरंग दल संयोजक राजू कुडले, अमोलजी सावंत, मातृशक्ती संयोजिका शोभाताई श्रीगोंदेकर, नांदेड प्रखंड मातृशक्ती संयोजिका आशाताई खिलारे यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. आयोजकांनी सामाजिक बांधिलकीतून घेतलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले. अशा शिबिरांमुळे समाजातील गरजूंपर्यंत आरोग्यसेवा पोहोचण्यास मदत होते, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




