पिंपरी – योगदान प्रतिष्ठान व नेत्रजोत डोळ्यांचा दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप संकल्पनेतून आयोजित केलेल्या शिबिराचे उद्धाटन भाजपाचे उपशहराध्यक्ष रवींद्र देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी परबत गुरुजी, प्रशांत जमादार, पंजाबराव मोंढे, रविंद्र प्रभुणे, मधुकर कुलकर्णी, मंगलदास खैरनार, हरिभाऊ मोहिते, सर्जेराव कोळी, सिताराम सुबंध, अजय कुलकर्णी, विजय अरक, कैलास राणे, माधव पाटील, सुभाष पंडित, शिवाजी देशमुख ,महादेव काटकर, शिवाजी राऊत, चंद्रकांत भालके, वर्षा आचार्य, विजया कारंडे, दिपाली कलापुरे, सरिता कुलकर्णी, सुनंदा राजपूत, कल्याणी खांडेकर, सरिता बिराजदार, माधुरी आहिरे, पल्लवी पाठक, छाया मस्कर आणि जेष्ठ नागरिक, महिला व बचत गटाच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याशिबिराचे संयोजन योगदान प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी केले होते.