Pimpri | मतदान करणा–या २१२ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी
Updated On:

पिंपरी, – ईशा नेत्रालय चिंचवडच्या वतीने शुक्रवार (दि. २२) ते बुधवार (दि. २८) रोजी मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये केवळ मतदान करणा–या नागरिकांनाच डोळे तपासणीचा लाभ घेता येणार होता. यामध्ये जवळपास २१२ नागरिकांनी डोळे तपासणी करुन घेतली.
या शिबिरात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा मोठ्या तपासणीचा लाभ घेताला. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना तसेच सर्व मेडीक्लेम, सीजीएचएस व कॅशलेस सुविधा उपलब्ध होत्या. हे शिबिर चिंचवड स्टेशनजवळ बिग बझाार येथे पार पडले. यावेळी ईशा नेत्रालय चिंचवड इन्चार्ज डॉक्टर वैभव अवताडे, मार्केटिंग इन्चार्ज गणेश कांबळे आणि विक्रम परदेशी, नेत्रतज्ञ वैभव अवताडे यांनी या शिबिरामध्ये डोळ्यांची तपासणी केली.
टॅग्स:





