क्रोनिक संधिवात, आमवातवर मोफत शिबीर
Updated On:

पुणे : विश्वानंद केंद्र संचलित हलचल सेंटर व ओंकार आयुर्वेद मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रोनीक संधिवात, आमवात तसेच हातापायामध्ये येणाऱ्या मुंग्यासाठी मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वाजता वाळवेकरनगर मधील विश्वानंद केंद्र येथे शिबिर होणार आहे.
शिबिरात तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून तपासणी व मार्गदर्शन, तज्ञ फिजिओथेरेपिस्ट डॉक्टरांकडून व्यायाम व योगविषयी मोफत मार्गदर्शन, अॅक्युप्रेशर तज्ञांकडून मोफत तपासणी व थेरेपी /ट्रीटमेंट आदींचा समावेश आहे. ओंकार आयुर्वेद मंदिर या औषध कंपनीतर्फे मोफत औषधे आणि मसाज तेल देखील यावेळी देण्यात येणार आहेत. मोफत तपासणी शिबिरासाठी ०२०२४२२२९०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

