झारखंडमध्ये चार नक्षलींच्या मुसक्या आवळल्या
Updated On:

सिमडेगा – झारखंडमध्ये सुरक्षा दलांनी सिमडेगा जिल्ह्यात एके ठिकाणी कारवाई करून चार नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेले हे चारही नक्षलवादी बंदी घालण्यात आलेल्या पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित आहेत.
त्यांच्याजवळ मोठा शस्त्रसाठा आणि गोळ्या तसेच स्फोटकेही आढळून आली आहेत, ती ताब्यात घेण्यात आली. या जिल्ह्यातील जंगलात नक्षलवाद्यांचा अड्डा असल्याची माहिती पोलीस गुप्तचरांना मिळाली होती.
त्यानुसार पोलीस पथकाने कनारोवन जंगलात जाऊन संशयित ठिकाणी छापा घातला. त्या ठिकाणी हे नक्षलवादी आढळून आले. पोलीस पथक पाहून तेथील नक्षलवाद्यांनी त्यांचा प्रतिकार करण्याऐवजी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना पाठलाग करून पकडण्यात आले.





