‘चाईल्ड पोर्न’चे आणखी चार गुन्हे दाखल

नऊ गुन्हे दाखल : अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफीत
पिंपरी – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस अल्पवयीन मुलांच्या अश्लील चित्रफीत सोशल मीडिया व संकेतस्थळांवर अपलोड करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. मागील महिनाभरात पाच जणांवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गुरुवारी पुन्हा चार जणांवर याच प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात असे गुन्हे दाखल झालेल्यांची संख्या नऊ वर गेली आहे.
महेश सहानी, बालाराम दास, किशोर भानुदास वाघमारे (वय-24 रा. चाकण) व अजय माताप्रसाद सागर (वय- 25, रा. चिखली) असे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.
शहरातील काहीजण अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करीत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गुरुवारी आणखी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चाकण, चिखली व वाकड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.





