चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला चार महिने तुरूंगवास

पुणे, दि. 13 – खिडकीचा गज कापून घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न करणाऱ्याला चार महिने तुरुंगवास आणि 1 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के.खान यांनी सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागणार असल्याचेही न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.

सुभाष दादा दिघे (वय 22, रा. टिंगरेनगर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत संजयपार्क, एअरपोर्ट रोड येथील 41 वर्षीय व्यक्तीने विमानतळ पोलिसात फिर्याद दिली आहे. 1 जानेवारी 2013 रोजी रात्री 1.30 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी काम पाहिले.

खिडकीचे गज कापून दिघे याने फिर्यादींच्या घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता. ही बाब फिर्यादी आणि घरातील इतर लोकांच्या लक्षात आले. त्यावेळी त्याच कापलेल्या खिडकीतून त्याने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी घरातील लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्ना केला. त्याने हाताबुक्‍क्‍यांने त्यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीला चांगल्या वर्तुणुकीच्या हमीवर सोडण्याची मागणी बचाव पक्षाने केली. तर, समाजात योग्य संदेश जाण्यासाठी आरोपीला शिक्षा देण्याचा युक्तीवाद ऍड. वामन कोळी यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.