कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मंदिराची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली चार जणांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी ‘डॉन’ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेल्या मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मंदिरातून पैसे चोरी करण्यासाठी मंदिराची तोडफोड केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.
रविवारी रात्री सिंध प्रांतात काही अज्ञात लोकांनी मंदिराची तोडफोड केली होती. सोमवारी थारचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अब्दुल्ला अहमदियार यांनी दिलेल्या सूचनेनुसार अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान चारही मुले अल्पवयीन असून आज पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.