Trump Praises Modi : ट्रम्प यांनी केले मोदींचे कौतुक, म्हणाले”मोदींना मिळालेले पंतप्रधान पद…”

न्यूजर्सी – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खूप चांगले काम केले आहे, अशा शब्दात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांचे अगदी तोंडभरून कौतुक केले आहे. भारताला आतापर्यंत आपल्यासारखा चांगला मित्र मिळाला नव्हता, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे मत व्यक्त करतानाच ट्रम्प यांनी 2024 मध्ये होणारी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचे सूतोवाच देखील केले.
आपण निवडणूक लढवावी, असे सगळ्यांनाच वाटते आहे. निवडणूकीच्या प्रक्रियेत आपण आघाडीावर आहोत. मात्र याबाबतचा निर्णय येत्या काही दिवसातच घेतला जाईल, असेही ट्रम्प म्हणाले. न्यूयॉर्कमधील बेडमिन्स्टर येथील गोल्फ क्लब येथे ट्रम्प यांनी ही मुलाखत दिली आहे.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा किंवा ज्यो बायडेन यांच्यापेक्षाही आपले भारताबरोबरचे संबंध अधिक चांगले होते का, असे विचारले असता या प्रश्नाचे उत्तर पंतप्रधान मोदींनाच विचारायला पाहिजे, असे ट्रम्प म्हणाले. मात्र आपल्यापेक्षा अन्य कोणाचेही मोदींबरोबर अधिक चांगले मित्रत्वाचे संबंध असतील, असे आपल्याला वाटत नसल्याचेही त्यांनी सागितले.
अमेरिकेचे अध्यक्ष असताना अमेरिकेत आणि भारतातही ट्रम्प हे पंतप्रदान मोदी यांच्याबरोबर मोठ्या समारंभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना मोदींच्या लोकप्रियतेचा लाभ मिळाला असल्याचे म्हटले जाते.
मोदी यांना मिळालेले पंतप्रधान पद त्यांना अगदी सहजच मिळालेले नाही. आम्ही दोघेही एकमेकांना खूप काळापासून ओळखत आहोत. ते खूप चांगले व्यक्ती आहेत, असे ट्रम्प म्हणाले.





