MLA Pass Away : दुःखद बातमी ! 3 वेळा आमदार राहिलेल्या ‘या’ दिग्गज नेत्याचे निधन
उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रदीर्घ काळ दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ राजकीय नेते आणि बस्ती जिल्ह्यातील रामनगर मतदारसंघाचे माजी आमदार राम ललित चौधरी यांचे लखनऊ येथे उपचारादरम्यान निधन (MLA Pass Away) झाले.

MLA Pass Away : उत्तर प्रदेशच्या राजकारणात प्रदीर्घ काळ दबदबा निर्माण करणारे ज्येष्ठ राजकीय नेते आणि बस्ती जिल्ह्यातील रामनगर मतदारसंघाचे माजी आमदार राम ललित चौधरी यांचे लखनऊ येथे उपचारादरम्यान निधन (MLA Pass Away) झाले.
सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ते अचानक पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर तातडीने त्यांना लखनऊ येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रामनगर मतदारसंघासह (MLA Pass Away) संपूर्ण बस्ती जिल्ह्यात प्रचंड शोककळा पसरली आहे.
साऊंटघाट विकासखंडातील परसा लाल शाही गावचे रहिवासी असणाऱ्या राम ललित चौधरी यांनी आपल्या सार्वजनिक कार्याचा पाया विद्यार्थी राजकारणातून रचला. विद्यार्थी चळवळीत सक्रिय असतानाच त्यांचा संपर्क थेट माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याशी आला.
चौधरी चरण सिंह यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते त्यांचे अत्यंत निकटवर्तीय सहकारी बनले. इतकेच नव्हे, तर चौधरी चरण सिंह पंतप्रधानपदी असताना राम ललित चौधरी यांनी त्यांचे खासगी सहाय्यक (PA) म्हणूनही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
पंतप्रधानांचे सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी सक्रिय निवडणूक राजकारणात उडी घेतली. १९८९ मध्ये जनता दलाने त्यांच्यावर विश्वास दाखवत रामनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.
त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजे १९९१ च्या निवडणुकीत जनता दलाच्याच तिकिटावर त्यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली. पुढे राजकीय समीकरणांनुसार त्यांनी बहुजन समाज पक्षात (बसपा) प्रवेश केला. १९९६ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाच्या (MLA Pass Away) चिन्हावर विजय मिळवून त्यांनी रामनगरमधून आमदारकीची ऐतिहासिक हॅटट्रिक नोंदवली.
गेल्या काही वर्षांपासून ते राष्ट्रीय राजकारणात नव्या भूमिकेत दिसत होते. २०२३ मध्ये त्यांनी सुहेलदेव भारतीय समाज पक्षात (सुभासपा) प्रवेश केला आणि सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळत होते.
स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क आणि विकासकामांच्या जोरावर त्यांनी रामनगर परिसराच्या राजकारणावर दीर्घकाळ आपला प्रभाव कायम ठेवला होता. त्यांच्या निधनाने उत्तर प्रदेशातील एका अनुभवी आणि झुंजार नेतृत्वाला राजकारण मुकले आहे.





