माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीत बढती
Updated On:

मुंबई – माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीत बढती मिळाली आहे. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. याआधी त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी होती.
पक्षाच्या नव्या राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये सुनील तटकरे, पी.पी.मोहम्मद फैजल या खासदारांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 12 सदस्य आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, तटकरे, छगन भुजबळ, फौजिया खान, पी.सी.चाको आदींचा त्यामध्ये समावेश आहे.





