Capitol riot case : ट्रम्प यांचे माजी सल्लागार पीटर नवारो दोषी

वॉशिंग्टन :- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिलवरील हल्ल्याची चौकशी करणाऱ्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह समितीला सहकार्य करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना कॉंग्रेसच्या अवमानाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
व्हाइट हाउसचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन यांच्यानंतर अमेरिकन कॉंग्रेसकडून अवमानाच्या आरोपांना सामोरे जाणारे नवारो हे ट्रम्पचे दुसरे सहकारी आहेत. यापूर्वी, बॅनन यांना दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते आणि त्यांना चार महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. तरीही अपील प्रलंबित असताना त्यांना सोडण्यात आले होते.
न्यायाधीश अमित मेहता यांनी नवारो यांना 9 जानेवारी रोजी शिक्षा सुनावली. या दोघांना एक वर्षापर्यंत कारावासाची तरतूद आहे.
अमेरिकी संसद परिसराला कॅपिटल हिल म्हणतात. रिपब्लिकन नेते डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतील 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅट नेते ज्यो बायडेन यांच्यासमोर पराभवाला सामोरे जावे लागले. ट्रम्प यांच्या समर्थकांवर निवडणूक निकालांमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप होत असून त्यांनी त्यांच्या समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
यानंतर 6 जानेवारी 2021 रोजी कॅपिटल हिल परिसरात सुमारे दोन हजार लोक जमले आणि ट्रम्प यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर जमावाने कॅपिटल हिलवर हल्ला केल्याचा आरोप आहे.





