प्रभात वृत्तसेवा पुणे – बांगलादेशी ठरवून माजी सैनिकाच्या घरासमोर एका संघटनेने घोषणाबाजी करून गोंधळ घातल्याची घटना चंदननगर भागात नुकतीच घडली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी करणे, तसेच गोंधळ घालण्याची कृती खेदजनक आहे. याप्रकरणी चाैकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. चंदननगर भागात माजी सैनिक कुटुंबीयांसह राहायला आहेत. २६ जुलै रोजी रात्री काही संघटनांचे कार्यकर्ते तेथे गेले. त्यांनी माजी सैनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी केले. सैनिक, तसेच त्याच्या कुटुंबीयांना बांगलादेशी असे संबोधले.