rohini Khadse : अकोल्यात एक दुर्देवी घटना घडली आहे. गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे असलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी सरकार आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड करून सांगणाऱ्या आमदार मॅडमने शिरसाट कुटुंबीयांची सर्वात आधी माफी मागायला हवी असे रोहिणी खडसे यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांचे नाव न घेता सुनावले आहे. तसेच जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत. त्यांना जरा हा फोटो दाखवा ! असेही रोहिणी खडसे संतापून म्हणाल्या आहेत. त्यांनी एक्स अकाऊंटवरुन ट्वीट केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी विधिमंडळ परिसरात काँग्रेस पक्षाचे आमदार आंदोलन करत असताना 25 दिवसांत गॅस सिलिंडर मिळतो, गॅस बूक करा असे विधान भाजप आमदार चित्रा वाघ यांनी केले होते. या ट्वीटमधून रोहिणी खडसे यांनी त्यांच्यावरती नाव न घेता टीका केली. जे लोक सांगतात ना की राज्यात मुबलक गॅस सिलिंडर आहेत. त्यांना जरा हा फोटो दाखवा ! अकोल्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांना काल यदुराज #गॅस एजन्सीसमोर सिलिंडरसाठी रांगेत उभे असताना आपला जीव गमवावा लागला आहे. “सिलिंडर बूक करा, २५ दिवसात येईल” असं वर तोंड… pic.twitter.com/ddrjb2lBeo — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 29, 2026 प्रकाश आंबेडकरांनी नोंदवला निषेध या घटनेवर बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापायी सामान्य नागरिकांचा जीव जातोय. सरकारचा तीव्र शब्दांत मी निषेध करतो. असे ते म्हणाले आहेत. नेमकं काय घडलं? अकोला जिल्ह्यातील अन्वी मिर्झापूर येथे ही दुर्देवी घटना घडली. गॅस सिलिंडरच्या रांगेत उभे असलेल्या वृद्धाला अचानक चक्कर आली आणि यातच त्यांना आपला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे संबंधित वृद्ध हे माजी सरपंच आहेत. त्यांचे नाव शंकरराव शिरसाट असून ते अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा आणि व्यवस्थेतील त्रुटींमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना व्यक्त होत आहे. हेही वाचा : Ashok Kharat Case : ‘तू दिसायला खूप सुंदर आणि..’; अशोक खरात महिलांचं माइंड रिडींग नेमका कसा करायचा? मोठी माहिती समोर