सायकलवरुन फिरणारे माजी खासदार

वाचकहो, आजच्या काळात खासदार किंवा माजी खासदार व्यक्‍ती म्हटले की साधनसंपन्न आणि आलिशान आयुष्य जगणाऱ्या नेत्याचे चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. तथापि, मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये एक माजी खासदार आहेत त्यांची स्थिती बरोबर याविरुद्ध आहे. हे खासदार महाशय आजही सायकलने जातात. इतकेच नव्हे तर वेळ मिळेल तेव्हा विड्या वळण्याचे काम करतात. त्या भागातील लोक त्यांना सायकलवाले नेताजी म्हणून संबोधतात. या माजी खासदारांचे नाव आहे राम सिंह अहिरवार.

रामसिंह हे उच्चविद्याविभूषित आहेत. 1967 मध्ये त्यांनी जनसंघाकडून निवडणूक लढवली होती आणि विजय मिळवत संसदेचे सदस्य बनले होते. आज ते 82 वर्षांचे आहेत. दररोज ते सायकलने अनेक किलोमीटरचा प्रवास करतात. त्यांना माजी खासदारांना दिली जाणारी पेन्शन मिळवण्यासाठीही बरीच यातायात करावी लागते. यासाठी त्यांनी बराच संघर्षही केला आहे. या संघर्षानंतर 2005 पासून त्यांना ही पेन्शन सुरू झाली. देशाच्या राजकारणात हे उदाहरण अपवादात्मकच म्हणावे लागेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.