Former MLA Narayan Patil । माढा लोकसभा मतदारसंघात रोज नवनवीन खेळी समोर येतायत. त्यातच शरद पवार यांनी महायुतीला जोरदार झटका दिलाय. कारण शिवसेना शिंदे गटाचा माजी आमदार शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा शिंदे गटासाठी मोठा धक्का मानाला जात आहे. करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. माजी आमदार नारायण पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत होते. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. नारायण पाटील यांच्या समवेत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती , माजी पंचायत समीती सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य , गावोगावचे सरपंच यांच्या सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. विधानसभेला संजय मामा वि. नारायण पाटील यांच्यात लढत ? Former MLA Narayan Patil । करमाळा विधानसभेची जागा महायुतीमधील अजित पवार गटाकडे जाणार असल्याने नारायण पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार जाण्याशिवाय पर्याय नव्हता . सध्या करमाळा येथे अजित पवार गटाचे संजय मामा शिंदे हे आमदार असून नारायण पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत नारायण पाटील हे महायुतीकडे होते तेव्हा या मतदारसंघातून संजय शिंदे यांनी 35 हजाराचे मताधिक्य घेतले होते. आता यावेळी करमाळा मतदारसंघात आमदार संजय मामा महायुतीकडे आहेत तर महायुतीतील माजी आमदार नारायण पाटील आज शरद पवार यांचे गटात असणार आहेत.