माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांच्या घरावर ईडीचा छापा ; कोणत्या प्रकरणी टाकली धाड ?

Former Minister Pratap Singh । काँग्रेस नेते आणि माजी मंत्री प्रताप सिंह खाचरियावास यांच्या घरावर ईडी (अंमलबजावणी संचालनालय) ने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिट फंड घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीने ही छापा टाकला आहे.
तब्बल ५०,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीशी संबंधित प्रकरणी ईडीने हा छापा टाकला असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामध्ये प्रताप सिंह खाचरियावास यांची भूमिका असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात, ईडीने यापूर्वीही त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
#WATCH | Jaipur: On ED raid at his residence, Congress leader Pratap Singh Khachariyawas says, “Today they have come here to conduct searches and raids; they can do it. I am going to cooperate with them. ED is doing its work, and I will do my work. I believe the BJP should not do… pic.twitter.com/tAbvZvWbBO
— ANI (@ANI) April 15, 2025
सकाळीच ईडीची धाड
सोमवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास जयपूरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील त्याच्या घरी ईडीच्या पथकाने कारवाई सुरू केली, जी अजूनही सुरू आहे. प्रताप सिंह खाचरियावास हे राजस्थानच्या मागील अशोक गेहलोत सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. या छाप्याची बातमी पसरताच एकच गोंधळ उडाला.
#WATCH | Jaipur, Rajasthan: On ED raid at his residence, Congress leader Pratap Singh Khachariyawas says, “…Governments keep changing, the time will change. Imagine what will happen to BJP when Rahul Gandhi comes to power. You (BJP) have started these proceedings, we will also… pic.twitter.com/fcLmmxmzb4
— ANI (@ANI) April 15, 2025
प्रताप सिंह खाचरियावास हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Former Minister Pratap Singh ।
प्रताप सिंह खाचरियावास हे काँग्रेस पक्षाचे एक मोठे नेते आहेत. ते राजस्थान सरकारमध्ये अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्री होते. ते अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते आणि सरकारच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक मानले जात होते.
हेही वाचा
भारतीय शेअर बाजारात उसळी! सेन्सेक्स १५०० अंकांनी वधारला ; निफ्टी २३२५० च्या पार





