मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकिल आनंद डागा यांना आज अटक करण्यात आली आहे. सीबीआयने ही अटक केली असल्याची माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरु असलेला तपास पोलीस उपनिरीक्षकाच्या माध्यमातून परिणाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's lawyer has been arrested. He has been brought to Delhi on transit remand. Two people including the CBI sub-inspector have been arrested in the case so far. Both arrested persons will be produced before the competent court: CBI pic.twitter.com/Qy7Ah1mpUz
— ANI (@ANI) September 2, 2021
अटक केल्यानंतर त्यांना चौकशीसाठी दिल्लीला रवाणा करण्यात येणार असल्याचे सुद्धा सीबीआयकडून सांगण्यात आले आहे. देशमुख यांच्याविरुद्धचा कथित प्राथमिक चौकशी अहवाल फोडल्याप्रकरणी सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा उपनिरीक्षक अभिषेक तिवारी याला अटक केली होती. त्यानंतर आता वकील आनंद डागा यांच्यासह अन्य् अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.