हवाना : क्यूबातील सर्वोचच न्यायालयाने माजी अर्थमंत्र्यांना हेरगिरीचया आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. क्युबामधये एखाद्या वरिष्ठ नेत्याला या आरोपाखाली क्युबामध्ये सुनावण्यात आलेली ही सर्वात मोठी शिक्षा आहे. माजी अर्थमंत्री अलेकझांड्रो गिल फेर्नांडेझ यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. लाचखोरी, कागदपत्रांची बनवाबनवी आणि कर चुकवेगिरीचया एका खटलयात दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांना २० वर्षांच्या तुरुंगवासाची आणखी एक शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. गिल हे २०१८ ते २०२४ या कालावधीमध्ये क्युबाचे अर्थमंत्री होते. अध्यक्ष मिगयुएल दाझ-कानेल यांचे ते अगदी निकटचे सहकारी होते. २०१९ मधये त्यांना अर्थमंत्री पदावरून हटवण्यात आले. त्यांना काही कालावधीसाठी उपपंतपरधान म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते. गिल यांनी गंभीर चुका केल्या आहेत आणि भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांच्या हकालपट्टीच्या काही आठवड्यांनंतर अधयक्ष दाझ-कानेल यांनी सांगितले. परंतु त्यांनी कोणतेही तपशील दिले नाहीत. गिल यांनी नेमके काय केले किंवा ते कोणासाठी हेरगिरी करत होते याबद्दल क्युबाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही माहिती दिली नाही. गिल यांनी वैयकतिक लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे नयायालयाने म्हटले आहे. गिल यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनीही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. २०२१ मध्ये क्युबामध्ये प्रमुख आर्थिक आणि आर्थिक सुधारणा करण्यासाठी गिल यांनीच पुढाकार घेतला होता. या सुधारणांमध्ये देशाची चलन व्यवस्था एकत्रित करण्याचा प्रयत्न समाविष्ट होता. परंतु आधीच आर्थिक संकट आणि काही उत्पादनांच्या कमतरतेमुळे त्रस्त असलेल्या क्युबामध्ये महागाईचा वेग वाढला.