Dr. Mukund Abhyankar Passes Away: कॉसमॉस को-ऑप. बँकेचे माजी अध्यक्ष डॉ मुकुंद अभ्यंकर यांचे आज दुपारी वृध्दापकाळाने वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. डॉ. अभ्यंकर कॉसमॉस बँकेच्या संचालक मंडळात 1978 पासून 46 वर्षाहून अधिक काळ कार्यरत होते. कॉसमॉस बँकेचे 9 वेळा त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. बँकेच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. अभ्यंकर नॅफकबचे (नवी दिल्ली) अध्यक्ष होते. सहकारी बँकींग क्षेत्रामध्ये त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता म्हणून तसेच रिझर्व्ह बँकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले. अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता. डॉ. अभ्यंकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे शुक्रवार दि. 17 एप्रिल रोजी त्यांचे पार्थिव विद्यापीठ रस्त्यावरील कॉसमॉस भवन या बँकेच्या मुख्य कार्यालयात सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 12:00 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.