बंगालमधील आरएसपीचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ चौधरी यांचे निधन
Updated On:

कोलकाता – पश्चिम बंगालचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विश्वनाथ चौधरी यांचे शनिवारी सकाळी कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निधन झाले. आठ वेळा आमदार राहिलेले चौधरी कर्करोगाशी झुंज देत होते. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांना एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आज सकाळी पावणे सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
चौधरी, क्रांतिकारी समाजवादी पक्षाचे (आरएसपी) नेते आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील बालूरघाटचे आमदार होते. १९८७ ते २०११ पर्यंत ते तुरुंग आणि समाजकल्याण मंत्री होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माजी मंत्र्यांच्या सन्मानार्थ सर्व राज्य सरकारी कार्यालयांमध्ये अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली. आरएसपीचे सरचिटणीस मनोज भट्टाचार्य म्हणाले की चौधरी यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी बालूरघाट येथे नेण्यात येईल.





