कडूस : दोंदे येते उभारण्यात आलेल्या वनराई बंधार्याने परिसरातील विहिरींची भूजल पातळी वाढण्यास फायदा होईल. पिकांना संरक्षित पाणी मिळते, पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय आणि घरगुती वापरासाठीही या पाण्याचा उपयोग होईल, अशी माहिती खेडचे कृषी मंडळ अधिकारी प्रवीण शिंदे यांनी दिली.दुष्काळ सदृश परिस्थितीत पावसाचे वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी अत्यंत सोपा व अल्पखर्चिक उपाय म्हणजे वनराई बंधारा. 1990मध्ये पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांनी वनराई बंधार्याची संकल्पना मांडली असून त्याचा अनेक गावांना फायदाही झाला आहे. खेड तालुक्यातील दोंदे गावामध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम करिता दोंदे गावामध्ये मावळ तालुक्यातील पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबी आणि तळेगाव दाभाडे येथील विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधार्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी खेड मंडळ कृषी अधिकार प्रवीण शिंदे, दोंदे गावच्या कृषी सहाय्यक मोहिनी सावंत-अकोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उढाणेस्थळ येथील मोठ्या ओढ्यावर, दोंदे ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी श्रमदानातून वनराई बंधारे बांधले. यावेळी सरपंच प्रतीक्षा दरवडे, उपसरपंच नंदा जाधव, जयसिंग शितोळे, राजू उढाणे, बाळासाहेब दरवडे, भरत दरवडे आदी ग्रामस्थ व कॉलेजचे विद्यार्थी दिग्विजय चव्हाण, श्रीकांत खुळे, विनायक नंजुंडे, ओम जैस्वाल, खुशाल वायकर, राम आमटे उपस्थित होते. दोंदे : येथे श्रमदानातून तयार करण्यात आलेला बंधारा.