महाळुंगे इंगळे- वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक चाकण वनक्षेत्र पुणे,यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आर्या लक्ष्मी इंटरप्राईजेस गट नंबर 244 गोनवडी रोड बिरदवडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे मागील दीड वर्षापासून येथे लाकडी बॉक्स तयार करण्यासाठी कच्चा रबर वुडचा वापर केला जात होता. लाकूड कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनला 24 इंच,15 इंच ,13 इंच इतक्या जाडीच्या आकाराच्या लाकडाला कापण्याची परवानगी वन विभागाची नसताना देखील अनधिकृतपणे मोठ्या प्रमाणात काम सुरू होते. तसेच या ठिकाणी आंबा, चिंच ,सावर , कडूनिंब ,आवळा अशा झाडांची लाकूड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. सदर लाकूड कारखाना अनिल मारुती बाणखेले राहणार मंचर तालुका आंबेगाव यांच्या मालकीचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे. सदरची कारवाई उपवन संरक्षक जयरामे गौडा जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. फिरते पथक पुणे,वन परिक्षेत्र कार्यालय चाकण, खेड ,संदेश पाटील, सहाय्यक वन संरक्षक, सचिन रतनवान( वन परिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक पुणे, चाकण, योगेश महाजन,वन परिक्षेत्र अधिकारी ,चाकण, प्रदीप रौंधळ, वन परिक्षेत्र अधिकारी, खेड, एन. एम. खताळ,वन परि मंडळ आळंदी, आगरकर , शांताराम गाडे .बापू शेतकरी, वन परि मंडळ चाकण वनरक्षक आंबेठाणवन परिक्षेत्र चाकण, खेड सर्व वन अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडली.