खादी महामंडळाकडून पादत्राणे उपलब्ध
Updated On:

नवी दिल्ली- खादी आणि ग्रामोद्योग महामंडळाने खादीच्या फॅब्रिकची पादत्राणे उपलब्ध केली आहेत. ही पादत्राणे महामंडळाच्या पोर्टलवरून खरेदी करता येतील, असे लघुउद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. पादत्राणे निर्मिती क्षेत्रात मोठी कामगिरी करण्याची भारताची क्षमता आहे. या क्षेत्रात भारत तिसऱ्या क्रमांकावर असून भारतातील बाजारपेठ 1.45 लाख कोटी रुपयांची तर निर्यात 55 हजार कोटी रुपयांची असल्याचे गडकरी यांनी सांगितले.





