पिंपरी | सांगवी फाटा येथील पदपथाचे काम सुरू
Updated On:

सांगवी, (वार्ताहर) – सांगवी फाटा येथील औंध जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारात पदपथाचे काम रखडल्याबाबत दैनिक प्रभातमध्येे नुकतेच वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने येथील पदपथाचे काम सुरू केले आहे.
औंध रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नव्याने पदपथ उभारण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाच्या वतीने या मार्गावर नव्याने पदपथ तयार करण्यात आला आहे. मात्र, वर्दळीच्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पदपथ तयार केले नव्हते.
त्यामुळे रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांना येथून मार्गस्थ होताना अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याची दखल घेतल्याने नागरिकांनी प्रभातचे आभार मानले.





