फुटबॉलस्टार लिओनल मेस्सीला करोनाची लागण
Updated On:

नवी दिल्ली – जगभरात करोना ससंर्गाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. तर काही देशांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आलं आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत अनेक सेलिब्रेटींना देखील करोना गाठताना दिसत आहे.
जागतीक पातळीवरचा स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सी याला देखील करोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आल आहे. मेस्सी अर्जेंटीना संघाचा कर्णधार आहे.
दरम्यान मेस्सी खेळत असलेल्या पॅरिस सेंट जर्मन क्लबमधील आणखी तीन खेळाडूंना करोनाची बाधा झाली आहे. यामध्ये जुओन बर्नाच, सर्जिओ रिको आणि नथान बीटमाजला यांचा समावेश आहे.





