Food Ordering: भारतातील ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात मोठा बदल होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत अॅप उघडून मेन्यू पाहणे, पदार्थ निवडणे आणि ऑर्डर देणे ही प्रक्रिया वेळखाऊ होती. मात्र, आता ही संपूर्ण प्रक्रिया खूप सोपी होणार आहे. लवकरच तुम्ही फक्त बोलून तुमच्या आवडीचं जेवण ऑर्डर करू शकणार आहात. या नव्या तंत्रज्ञानासाठी स्विगी ने सर्वम एआय सोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून ‘व्हॉइस-लेड कॉमर्स’ ही नवी सेवा सुरू करण्यात येत आहे. या सुविधेमुळे तुम्हाला काही टाईप करण्याची किंवा अॅपमध्ये शोध घेण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, तुम्ही फक्त “एक पनीर बटर मसाला आणि दोन नान पाठवा” असं बोललात, तर एआय तुमची ऑर्डर समजून थेट प्रक्रिया पूर्ण करेल. Food Ordering ही सेवा केवळ जेवण ऑर्डर करण्यापुरती मर्यादित नाही. स्विगीच्या मुख्य डिलिव्हरी सेवेसोबतच इंस्टामार्ट (ग्रॉसरी) आणि डायनआउट (टेबल बुकिंग) या सेवांमध्येही ती वापरता येणार आहे. त्यामुळे किराणा सामान किंवा हॉटेलमध्ये टेबल बुक करणंही आवाजाच्या मदतीने शक्य होईल. Food Ordering यातील आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पेमेंटची सोय. या सिस्टिममध्ये रेझरपे चा पेमेंट गेटवे जोडण्यात आला आहे. त्यामुळे युजर्सना ऑर्डर देण्यापासून पैसे भरण्यापर्यंत सगळं काम फक्त आवाजाच्या मदतीने करता येणार आहे. म्हणजेच, एकही बटन न दाबता संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल. या तंत्रज्ञानाची खासियत म्हणजे ते केवळ इंग्रजीपुरतं मर्यादित नाही. सर्वम एआयचं मॉडेल हिंदीसह १० पेक्षा जास्त भारतीय भाषांना सपोर्ट करतं. त्यामुळे छोट्या शहरांमधील किंवा इंग्रजी टाईप करण्यात अडचण असलेल्या लोकांसाठीही ही सेवा खूप उपयोगी ठरेल. भविष्यात संवाद हा नवीन इंटरफेस बनण्याची शक्यता आहे. Food Ordering याशिवाय, एआय इम्पॅक्ट समिटमध्ये या तंत्रज्ञानाचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. या वेळी अॅप किंवा इंटरनेटशिवायही ऑर्डर देता येऊ शकते, असं दाखवण्यात आलं. या सगळ्या प्रक्रियेमागे ‘इंडस’ नावाचा एआय असिस्टंट काम करतो. हा असिस्टंट सर्चपासून ते पेमेंटपर्यंत सर्व काम स्वतःच हाताळतो. एकूणच, फूड ऑर्डरिंगचा अनुभव आता अधिक सोपा, जलद आणि स्मार्ट होणार आहे. फक्त बोलून जेवण मागवण्याची सुविधा आल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अधिक सहज आणि सर्वांसाठी सुलभ होईल. Food Ordering