PMC Election 2026 | पुण्यात भाजप आणि शिवसेनेची युती फिस्कटल्याची माहिती समोर येत आहे. शिंदेंची शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. भाजपने फक्त १६ जागा दिल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जात असून सर्वांना एबी फॉर्म दिले जातील, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे पुण्याचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी दिली आहे. जागावाटपाच्या निर्णयाबाबत आज पुण्यात शिवसेनेची बैठक पार पडणार होती, या बैठकीसाठी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत पुण्यात येणार होते. मात्र उदय सामंत पुण्यात येण्याअगोदरच शहराध्यक्ष आणि उपनेत्यांनी पुण्यात कार्यकर्त्यांची बाजू घेतली. ज्यात शिवसेनेने 165 जागा लढणार असल्याचं सांगितलं आहे. समाधानकारक जागा मिळत नसल्याने, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचं सांगत युतीत लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्म देण्यासाठी शहराध्यक्ष आणि उपनेते हॉटेलमधून बाहेर पडले आहेत. नेमकं काय घडलं? भाजपकडून शिंदेसेनेला जागा वाटपाबाबत उत्तरे मिळाली नसल्यामुळे शिंदेसेनेची आज बैठक पार पडली. परंतु या बैठकीत दोघांची युती तुटल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीतून रवींद्र धंगेकर आणि नाना भानगिरे बाहेर पडले आहेत. सर्व कार्यकर्त्यांना एबी फॉर्म देऊन अर्ज भरले जाणार असल्याचे भानगिरे यांनी सांगितले आहे. PMC Election 2026 | दरम्यान, सुरूवातीपासून भाजपकडून शिवसेनेने किमान २५ जागा तरी पक्षाला मिळाव्यात असा आग्रह धरण्यात आला. मात्र वाटाघाटीनंतरही भाजपने शिवसेनेला १६ जागा सोडण्याची तयारी दर्शवली. १६५ पैकी फक्त १६ जागा लढण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेतील स्थानिक नेते सकारात्मक नसल्याचे चित्र पाहायला मिळालं. याबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी दर्शवली होती. मात्र अद्यापही शिवसेना-भाजप युतीबाबत पुण्यात संभ्रम आहे. PMC Election 2026 | हेही वाचा : पुणे महापालिका निवडणूक : शिवसेनेत नेमकं काय घडतयं? नीलम गोऱ्हेंनी आतली बातमी सांगितली म्हणाल्या…