तेल अविब – जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमधील महानगरांमध्ये वाहतुकीची कोंडी ही एक प्रमुख समस्या आहे आता या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत आता इस्त्रायलमध्ये नुकतीच फ्लाईंग टॅक्सीची चाचणी यशस्वी झाली असून जर व्यावसायिक पद्धतीने या फ्लाईंग टॅक्सी कार्यरत झाल्या तर वाहतूक कोंडीवर निश्चितच तोडगा निघणार आहे.
इस्त्राईलमधील 11 कंपन्यांनी एकत्रितपणे या फ्लाईंग टॅक्सीची चाचणी घेतली 30 किलोमीटरचा एकूण प्रवास या फ्लाईंग टॅक्सीने करण्यात आला ज्यामध्ये दोन प्रवासी 200 किलो सामानासह बसवण्यात आले होते जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर कार्यरत असलेल्या ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून ही फ्लाईंग टॅक्सी अस्तित्वात आणण्यात आली आहे.
रस्त्यांचा वापर न करता रस्त्यापासून उंच काही फुटावरून ह्या फ्लाईंग टॅक्सी उडणार आहेत दि जुरिश टाइम्स या वृत्तपत्राने याबाबत माहिती दिली असून इस्त्राईल सरकारने तीन वर्षांपूर्वीच ड्रोन तंत्रज्ञान वापरून फ्लाईंग टॅक्सी कार्यरत कराव्यात असे धोरण स्वीकारले होते.
येत्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये इस्रायलमधील मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारचा फ्लाईंग टॅक्सी उडताना दिसतील असा या कंपन्यांचा दावा आहे इस्रायल सरकारने या विषयातील स्पर्धा टाळण्यासाठी देशातील प्रमुख 11 कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणले असून या कंपन्यांच्या माध्यमातूनच या फ्लाईंग टॅक्सीची निर्मिती केली जाणार आहे या प्रयोगाबाबत जास्त कोणतीही माहिती देण्यास इस्रायल सरकारने नकार दिला आहे त्यामुळे इस्रायल मध्ये फ्लाईंग टॅक्सीची चाचणी यशस्वी झाली आहे एवढीच माहिती आत्तापर्यंत प्रदर्शित करण्यात आली आहे.