Radhika Madan : टीव्हीच्या छोट्या पडद्यावरून बॉलिवूडमध्ये यशस्वी वाटचाल करणारी अभिनेत्री राधिका मदान आज, 1 मे 2026 रोजी तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर राधिकाने इंडस्ट्रीत तिची वेगळी ओळख निर्माण केली असून आज ती बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक समजली जाते. या अभिनेत्रीने करिअरची सुरुवात ‘मेरी आशिकी तुम से ही’ या लोकप्रिय मालिकेतून केली. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर तिने मोठ्या पडद्याकडे वळत 2018 मध्ये पटाखा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या या चित्रपटातून तिला संधी मिळाली, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. यानंतर राधिका ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात झळकली, पण हा चित्रपटही प्रेक्षकांना आकर्षित करू शकला नाही. 2020 मध्ये प्रदर्शित झालेला अंग्रेजी मीडियम चित्रपटात ज्यात इरफान खान आणि करीना कपूर खान होते, तोही चित्रपट अपेक्षित यश मिळवू शकला नाही. (Radhika Madan) त्यानंतर कुत्ते आणि सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ यांसारखे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. 2024 मध्ये आलेल्या सरफिरा या चित्रपटात अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्यासोबत राधिका दिसली, मात्र हा चित्रपटही विशेष कमाई करू शकला नाही. (Radhika Madan) Radhika Madan : एकामागून एक फ्लॅाप चित्रपट; तरीही बॅालिवूडमध्ये नाव! असा आहे अभिनेत्री राधिका मदानचा थक्क करणारा प्रवास… आतापर्यंत जितके चित्रपट राधिका मदान हिने केले. त्यापैकी एकही चित्रपट फार काही कमाल करू शकलेले नाही. असे असले तरीही राधिकाच्या अभिनयाने अनेकांची मने तिने जिंकली आहेत. त्यामुळे ही अभिनेत्री अनेकांच्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहे. चित्रपटगृहांव्यतिरिक्त, राधिकाने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही काम केले असून ‘सुभेदार’, ‘कच्चे लिंबू’ आणि शिद्दत यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपली अभिनय क्षमता सिद्ध केली आहे. हेही वाचा : UN Women Report: एआय आणि डीपफेकचा वाढता धोका; महिलांसाठी इंटरनेट होतंय अधिक असुरक्षित