आसाममधील काझीरंगा अभयारण्यात पुरामुळे 116 प्राण्यांचा मृत्यू
Updated On:

गुवाहटी – आसाम राज्यातील काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्यात 90 टक्क्यांपेक्षा अधिक जमीन आणि वनक्षेत्र मुसळधार पाण्यामुळे पुराखाली गेले आहे. पुरातील पाण्यात डुबल्यामुळे आणि वाहून गेल्यामुळे आतापर्यंत कमीत कमी 116 वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तर 143 वन्यप्राण्यांना वाचविण्यात यश आले आहे.
वन विभाग आणि काझीरंगा अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, पुरामुळे अनेक वाघ आणि गेंड्यांनी आपला निवास सोडून आजुबाजूच्या गावांमध्ये आणि उंच भागावर आश्रय घेतला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अभयारण्याचा 430 चौ. कि.मी. क्षेत्राचा 90 टक्के भाग पुराखाली गेला आहे. काझीरंगा अभयारण्याच्या जवळील राष्ट्रीय महामार्ग-37 वर अनेक वन्य प्राणी फिरत असल्याचे दिसले आहेत. यामुळे वाहनांची ये-जा बंद झाली आहे.





