Flipkart Big Billion Days 2026 : फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल जाहीर! फोन, लॅपटॉपवर मोठ्या ऑफर्सची शक्यता; तारीख झाली फायनल
Flipkart Big Billion Days 2026 बँक ऑफर्सचाही ग्राहकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. Axis Bank आणि ICICI Bank यांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास काही व्यवहारांवर १० टक्क्यांपर्यंत बचत मिळू शकते. याशिवाय Flipkart SuperMoney आणि Flipkart Credit Card वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही बचतीच्या ऑफर्स उपलब्ध होऊ शकतात.

Flipkart Big Billion Days 2026: ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. फ्लिपकार्टने २०२६ मधील बहुप्रतीक्षित ‘बिग बिलियन डेज’ सेलची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इतर वस्तू खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता या सेलवर लागले आहे. यंदाच्या सेलमध्ये अनेक उत्पादनांवर मोठ्या सवलती आणि आकर्षक ऑफर्स मिळण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल यंदा ९ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र, फ्लिपकार्ट क्रेडिट कार्डधारकांना या सेलचा फायदा एक दिवस आधी म्हणजेच ८ ऑक्टोबरपासून घेता येणार आहे. त्यामुळे काही खास डील्स सुरुवातीलाच घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
कंपनीने यंदाच्या सेलसाठी एक स्वतंत्र वेबसाइटही सुरू केली आहे. त्यामुळे आगामी ऑफर्स आणि डील्सबाबत ग्राहकांना माहिती मिळण्यास मदत होणार आहे. मात्र, कोणत्या उत्पादनावर किती सवलत मिळणार, याचा संपूर्ण तपशील अद्याप फ्लिपकार्टकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
या सेलमध्ये जागतिक ब्रँड्सच्या विविध इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर आकर्षक किंमती आणि ऑफर्स मिळणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा सेल महत्त्वाचा ठरू शकतो.
बँक ऑफर्सचाही ग्राहकांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. Axis Bank आणि ICICI Bank यांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास काही व्यवहारांवर १० टक्क्यांपर्यंत बचत मिळू शकते. याशिवाय Flipkart SuperMoney आणि Flipkart Credit Card वापरणाऱ्या ग्राहकांसाठीही बचतीच्या ऑफर्स उपलब्ध होऊ शकतात. मात्र, या ऑफर्सच्या अटी आणि कमाल सवलतीचा तपशील सेल सुरू होण्यापूर्वी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सर्वात जास्त उत्सुकता मात्र स्मार्टफोनच्या ऑफर्सबाबत आहे. विशेषतः आयफोन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांचे या सेलवर लक्ष आहे. आयफोनच्या काही जुन्या मॉडेल्सच्या किंमतीत अलीकडे बदल झाल्याने ग्राहकांना आता बिग बिलियन डेज सेलमध्ये काही विशेष सवलत मिळते का, याची उत्सुकता आहे.
Samsung Galaxy S26 सीरीजवरही ऑफर मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सॅमसंगच्या या फोनवर फ्लिपकार्टकडून सध्या कोणतीही ठोस सवलत अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्राहकांनी अधिकृत ऑफर जाहीर होईपर्यंत वाट पाहणे महत्त्वाचे आहे.
दरवर्षी फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्ससोबतच कपडे, घरगुती वस्तू, अॅक्सेसरीज आणि इतर अनेक उत्पादनांवरही ऑफर्स पाहायला मिळतात. यंदा कोणत्या ब्रँडच्या उत्पादनांवर किती सवलत मिळणार, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
फ्लिपकार्टकडून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी ऑफर्स आणि डिस्काउंटची माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन फोन किंवा लॅपटॉप घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी सेलपूर्वी किंमतींची तुलना करणे आणि बँक ऑफर्सच्या अटी तपासणे फायदेशीर ठरू शकते.





