नवी दिल्ली – ‘फणी’ हे चक्रिवादळ ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले असून, या वादळामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ताशी 200 किलोमीटर वेगाने वादळाचे वारे वाहत आहेत. हे वादळ आता पश्चिम बंगाल मध्ये पोहचले असून, राज्यात जोरदार वारा आणि पाऊस चालू आहे. या वादळाचा फटका विमानसेवेला सुध्दा बसला आहे.
‘फणी’ या वादळामुळे गुवाहटीमध्ये 58, अगरतलामध्ये 8, दीमापुर आणि लीलाबाडीमध्ये प्रत्येकी 2 तर डिब्रूगढमध्ये 4 आणि इंफालमध्ये 6 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले असल्याची माहिती एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने दिली आहे.
Airports Authority of India, North Eastern Regional Headquarters: 59 flights cancelled in Guwahati, 8 in Agartala, 2 in Dimapur, 2 in Lilabari, 4 in Dibrugarh, 6 in Imphal. #CycloneFani pic.twitter.com/9ZgFQsoEyh
— ANI (@ANI) May 4, 2019