Hatkanangle Lok Sabha Raju Shetty| देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली जात आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू झाली आहे. यातच 15 एप्रिल रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘एकलो चलो रे’ चा नारा दिला होता. त्यानुसार काल सकाळी दसरा चौकातून मोठ शक्ती प्रदर्शन करत बैलगाडीमधून जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर राजू शेट्टीच्या एकूण संपत्ती किती याची आकडेवारी समोर आली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे यांनी काल सकाळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यामधून राजू शेट्टी यांची संपत्ती समोर आली असून गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांच्या संपत्तीमध्ये ४५ लाखांची वाढ झाली आहे. २०२४ साली राजू शेट्टी यांची मालमत्ता २ कोटी ८१ लाख ३४ हजार ८६६ रुपये एवढी झाली आहे. तर २०१९ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांची एकूण मालमत्ता २ कोटी ३६ लाख ४७ हजार ३३३ रुपये होती. तसेच राजू शेट्टी यांनी पुण्यामध्ये ३२ लाखांचा एक फ्लॅट खरेदी केला आहे.
राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राप्रमाणे त्यांची एकूण संपत्ती –
१) रोख शिल्लक- ५० हजार
२) बँक शिल्लक- ९ लाख ८३ हजार २४६
३) गुंतवणूक- स्वाभिमानी दुध संघ व इतर- ७ लाख ३० हजार
४) सहकारी संस्था व कंपनी शेअर्स- १५ लाख ७८ हजार ४२०
५) विमा पॉलिसी- ४१ लाख ३३ हजार ८३
६) वहाने- आजचे मुल्यांकन
अ) इनोव्हा- क्रिस्टा २०१६
ब) क्वॉलिस २००३ शेतकऱ्यांकडून गिफ्ट- ४० हजार
क) रेनॉल्ट डस्टर- ४ लाख
ड) फॉर्च्यनूर २०२२- शेतकऱ्यांकडून गिफ्ट- ३० लाख
इ) यामाहा एफझेडआय ट्यू व्हिलर- ५० हजार
ई) हिरा इलेक्ट्रीक बस- १ लाख २२ हजार ३७३
७) सोने जिन्नस- १० लाख ८५ हजार
८) शेतजमिन मालमत्ता वारसाप्राप्त-आजचे मुल्यांकन- २५ लाख
९) शेतजमिन मालमत्ता-खरेदी केलेली आजचे मुल्यांकण- ४७ लाख
१०) एन.ए प्लॉट-स्वाभिमानी इंडस्ट्रीजमध्ये- ३५ लाख
११) इमारत बांधकाम मालमत्ता -शिरोळ- ७० लाख
१२) पुणे फ्लॅट खरेदी २८-१२-२०२०- ३२ लाख
१३) स्वाभिमानी को-ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट येथे अमाानत डिपॉझीट- १ कोटी १९ हजार
कर्ज तपशील-
१)स्टेट बँक ऑफ इंडिया-फॉर्च्युनर गाडी कर्ज- १ लाख ८ हजार १२१
२) स्टेट बँक ऑफ इंडिया- पुणे प्लॅट खरेदी कर्ज- २३ लाख ९५ हजार ४४९
३) आयडीबीआय बँक शाखा जयसिंगपूर- २१ लाख ६ हजार १८६
४) कृषी भुषण विकास सेवा सोसायटी-पीक कर्ज- ८७ हजार ५००
५) कृषी भुषण विकास सेवा सोसायटी-क्षारपड जमिन सुधारणा कर्ज – २ लाख ५९ हजार
६) स्वाभिमानी को-ऑफ इंडस्ट्रीज इस्टेट येथे अनामत डिपॉझीटसाठी कर्ज – १ कोटी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत होणार आहे. महायुतीकडून खासदार धैर्यशील माने मैदानात आहेत, तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजीत पाटील आहेत. तर वंचित बहुजन आघाडी कडून डी.सी. पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील या निवडणुकीत उतरले आहेत.
हेही वाचा:
‘पंतप्रधानांवर निवडणूक लढवण्यावर ६ वर्षांची बंदी घाला’ ; दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल