फडकेवस्ती येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत उत्साहात ध्वजारोहण
Updated On:

चिंबळी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, फडकेवस्ती (निघोजे) येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत उत्साहपूर्ण वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला, अशी माहिती मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी दिली.या उपक्रमात ध्वजपूजन नाना फडके आणि कैलास भागुजी येळवंडे यांनी केले, तर ध्वजारोहण लताताई यशवंत फडके आणि माजी उपसरपंच इंदिरा गणेश फडके यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी केले, तर मान्यवरांचे आभार शिक्षिका सिताबाई गेंगजे यांनी मानले.





