Maharashtra Assembly Election 2024 – शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पाच आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावेळी दोन-तीन सोडता सर्व आमदार आमच्याकडेच येतील. रात्रीपासून हे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटले आहे. सामंत म्हणाले, ठाकरेंचे काही आमदार आमच्यासंपर्कात् आहेत. त्यांच्याबद्दल एकनाथ शिंदे घेतील. ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा आरोप आता समोरून केला जातोय. जो धनुष्यबाण दुसऱ्याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलोय. गद्दारी कोणी केली हे पुन्हा एकदा दाखवून दिले, असेही ते म्हणाले. महायुतीचे कोकणमध्ये निवडून आलेले आमदार कोकणचा विकास करू याचा आम्हाला विश्वास आहे. तिथे उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे देखील विजयी झाले आहेत. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येणारच होती हे मला माहित होते, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. साामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलेली विकासकामं जनतेने पाहिली आहेत. त्यामुळे जनतेचा कौल महायुतीला असल्याचे स्पष्ट झाले आहे. रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 1 लाख 11 हजार 335 मते मिळवून उदय रविंद्र सामंत हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी घोषित केले. बाळ माने यांना दुसऱ्या क्रमांकाची 69 हजार 745 इतकी मते मिळाली.