FIDE World Rapid and Blitz C’ship 2024 | प्रज्ञानंद, अर्जुनसह पाच भारतीय खेळाडू होणार सहभागी…

लॉसने – आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरिगेसी, कोनेरू हंपी, द्रोणवल्ली हरिका आणि आर वैशाली हे पाच भारतीय खेळाडू आगामी फिडे २०२४ वर्ल्ड रॅपिड आणि ब्लिट्झ चॅम्पियनशिपमध्ये आव्हान देतील.
स्पर्धा न्यूयॉर्क येथे २६ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार असून प्रथमच उत्तर अमेरिकेत स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडू यात सहभागी होणार असल्याचे फिडेने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. याचबरोबरीने पाच वेळा विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, फॅबियानो कारुआना, वेस्ली सो आणि लेव्हॉन अरोनियन हे देखील या स्पर्धेचा भाग असतील.
World Chess Championship 2024 : गुकेशने गतविजेत्या लिरेनला पुन्हा रोखले; सातव्या लढतीतही बरोबरी…
या स्पर्धेची सुरुवात 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत रॅपिड चॅम्पियनशिपने होईल, त्यानंतर 29 डिसेंबर रोजी एक दिवसाची विश्रांती असून ब्लिट्झ चॅम्पियनशिपचे सामने 30 आणि 31 डिसेंबर रोजी खेळवले जातील.



