पिंपरी | सामुदायिक विवाहसोहळ्यात पाच जोडपी विवाहबध्द

कार्ला, (वार्ताहर) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने संस्कारशाळा आश्रम, दहिवली कार्ला येथे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाहसोहळ्यात मावळ तालुक्यातील पाच जोडपी विवाह बंधनातअडकली. सोहळ्याचे यंदाचे दुसरे वर्ष आहे.
सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त सकाळी साखरपुडा, हळदी व सायंकाळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या नववधूला सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफुले, नथनी, पैंजण,जोडवी व मनगटी घड्याळ दिले. तसेच साखरपुड्याची साडी व लग्नाचा शालू, संसार उपयोगी वस्तू देखील आयोजकांकडून देण्यात आल्या. तसेच वधू वरांना साखरपुड्याचा व लग्नाचा पोशाख देण्यात आले.
बँड पथक, वाजंत्री, रथ यांंच्या गजराने वराची मिरवणूक काढण्यात आली. विवाह सोहळ्याचे आयोजन सोहळा समितीचे अध्यक्ष अमोल भेगडे, मानद अध्यक्ष सचिन भानुसघरे, कार्याअध्यक्ष मनोज येवले, संस्थापक माजी सभापती शरद हुलावळे, महिला अध्यक्षा सायली बोत्रे, चंद्रकांत शेलार, संतोष केदारी, संदीप तिकोणे, सदस्य भाऊसाहेब हुलावळे, सुनिल गरुड, अशोक पडवळ, मुरारीलाल शर्मा, मच्छिंद्र केदारी,
मंगेश हुलावळे, मारुती येवले, नितिन वाडेकर, विशाल जमदाडे, सीमा आहेर, दिलीप खेंगरे, एकनाथ गायकवाड, सीमा बालगुडे, संगीता केदारी, सोमनाथ सावंत, भाऊसाहेब मापारी, संदीप भानुसघरे, शंकर पडवळ, नवनाथ कोंडभर, सुनिल गायकवाड, नितिन देशमुख, खंडु शेलार, बाबाजी सोंडेकर, राम येवले, सतीश मोरे, शांताराम ढाकोळ, किसन येवले, भगवान देशमुख, शेखर दळवी, खंडू आहेर, बबन गरुड, उल्हास दळवी यांनी केले.





