नेर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या पाच मोटारी जप्त
Updated On:

तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांची कारवाई
वडूज (सातारा) – नेर ता खटाव येथील तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा मोटारीच्या साह्याने केला जात असल्याची माहिती तहसीलदार डॉ अर्चना पाटील यांना मिळाल्यानंतर आज त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाच मोटारी जप्त केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी सध्या तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना या तलावात पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्यात आले आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी या तलावातील पाणी मोटारी च्या साह्याने काढून पाणी उपसा केल्याचे समजल्यानंतर तहसीलदार अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री खाडे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जाऊन पाच मोटारी जप्त केल्या.
दरम्यान बेकायदेशीर रित्या पाणी उपसा केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली.





